मंगळवार, 24 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. आयटी
  3. आयटीच्या जगात
Written By
Last Modified: सोमवार, 6 मे 2019 (14:57 IST)

BSNL ने या दोन सर्वात लोकप्रिय प्रीपेड योजना बंद केल्या, दररोज मिळत होता 4GB डेटा

भारत संचार निगम लिमिटेड (BSNL) ने त्यांच्या दोन लोकप्रिय प्रीपेड योजना बंद केल्या आहे. बीएसएनएलने 333 आणि 444 रुपयांचे प्रीपेड प्लॅन रद्द केले आहे. बीएसएनएलने या दोन योजना 2017 मध्ये सुरू केल्या होत्या. त्याच वेळी कंपनीने सिक्सर प्लॅन 666 देखील लॉन्च केला होता. 
 
त्याच वेळी, मीडियाने दिलेल्या माहितीनुसार असेही म्हटले जात आहे की BSNL ने 339 रुपये, 379 रुपये आणि 392 रुपयांचे प्लॅन्स देखील बंद केले आहे. BSNLचा हा निर्णय अशा वेळी घेण्यात आला आहे जेव्हा कंपनीने बंपर ऑफरची वैधता 30 जून 2019 पर्यंत वाढविली आहे, त्या अंतर्गत काही ग्राहकांना दररोज 2.21 जीबी डेटा मिळेल. 
 
बीएसएनएलच्या कोलकाता वेबसाइटवर 333 आणि 444 रुपयांचे प्लॅन दिसतच नाही आहे. बीएसएनएलच्या 333 रुपयांच्या योजनेत दररोज 3 जीबी डेटा आणि 444 रुपयांच्या योजनेत दररोज 4 जीबी डेटा मिळत होता. याशिवाय, बीएसएनएल नेटवर्कवर अनलिमिटेड कॉलिंगसह ईरोज नाऊचे सबस्क्रिप्शन देखील मिळत आहे.