शुक्रवार, 3 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. आयटी
  3. आयटीच्या जगात
Written By
Last Modified: शनिवार, 4 मे 2019 (16:26 IST)

फेसबुक बंद करणार ग्रुप व्हिडिओ चॅट अॅप 'बॉनफायर'

फेसबुकने ग्रुप व्हिडिओ चॅटच्या मुख्य अॅप 'हाउसपार्टी' च्या एका क्लोनला बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. अहवालानुसार, 'बॉनफायर' नावाची क्लोन अॅप या महिन्यात काम करणे थांबेल. फेसबुकने 2017 मध्ये याचे परीक्षण सुरू केले होते.  
 
एका वक्तव्यात फेसबुकने म्हटले आहे की, "मे मध्ये आम्ही 'बॉनफायर' बंद करीत आहोत. आम्ही यामुळे जे काही पण शिकलो आहोत आम्ही त्या तत्त्वांना इतर वर्तमान आणि भविष्यातील उत्पादनांमध्ये सामील करू. " अॅपच्या परीक्षणाची सुरुवात 2017 च्या शेवटी डेन्मार्कमध्ये झाली होती.  
 
मुख्य अॅप 'हाउसपार्टी' एक ग्रुप व्हिडिओ चॅट अॅप आहे ज्यात यूजर्सला अॅप ओपन केल्यावर कोण-कोण ऑनलाईन आहेत हे कळतं आणि ते त्यांच्याबरोबर व्हिडिओ चॅट करू शकतात. फेसबुक इंस्टाग्राम आणि मेसेंजरसारख्या आपल्या इतर प्लॅटफॉर्मवर देखील ग्रुप व्हिडिओ चॅट सारखे फीचर्स जोडत आहे.