शनिवार, 11 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: शनिवार, 13 एप्रिल 2019 (09:16 IST)

नरेंद्र मोदी फेसबुकवर सर्वाधिक लोकप्रिय नेता

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्‍ना सोशल मीडियावर फॉलो करणार्‍यांची संख्‍या मोठी आहे. मात्र आता यामध्‍ये आणखी एक भर पडली आहे. नरेंद्र मोदी यांच्‍या नावावर एका विक्रमाची नोंद झाली आहे. फेसबुकवर भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि ब्राझीलचे नवे राष्ट्रपती जायर बोल्सोनारो यांना मागे टाकत फेसबुकवर सर्वाधिक लोकप्रिय नेता म्हणून ओळख निर्माण केली आहे.
 
वर्ल्ड लीडर ऑन फेसबुकच्‍या २०१९ अहवालानुसार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वैयक्तिक फेसबुक पेजला ४.३५ कोटी लाईक्स आहेत तर त्यांच्याशी जोडलेल्या इतर पेजला जवळपास १.३७ कोटी लाईक्स आहेत. मोदी यांच्यानंतर दुसऱ्या नंबरवर अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा नंबर लागतो. डोनाल्ड ट्रम्प यांच्या फेसबुक पेजला २.३० कोटी लाईक्स आहेत.