गुरूवार, 2 फेब्रुवारी 2023
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. आगामी चित्रपट
Written By
Last Modified बुधवार, 10 एप्रिल 2019 (18:04 IST)

‘पीएम नरेंद्र मोदी’ या चित्रपटाच्या प्रदर्शनाला निवडणूक आयोगाने स्थगिती

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जीवनावर असलेला  ‘पीएम नरेंद्र मोदी’ या चित्रपटाच्या प्रदर्शनाला निवडणूक आयोगाने स्थगिती दिली असून, लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हा चित्रपट प्रदर्शित करणे म्हणजे आचारसंहितेचा भंग आहे असा आरोप विरोधकांनी केला होता. या चित्रपटाच्या प्रदर्शनाला स्थगिती देण्याची मागणी करणारी याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली होती. याचिका फेटाळत असताना सर्वोच्च न्यायालयाने प्रदर्शनाचा निर्णय निवडणूक आयोग घेईल असे सांगितले होते. निवडणूक आयोगाने या बायोपिकच्या प्रदर्शनाला स्थगिती दिली असून आता तो पुढे ढकलला गेला आहे.

उद्या म्हणजेच ११ एप्रिल रोजी हा चित्रपट प्रदर्शित होणार होता. देशात ११ एप्रिलपासून लोकसभा निवडणुकांतील पहिल्या टप्प्याच्या मतदानाला सुरुवात होणार असून, निवडणूक काळात चित्रपट  प्रदर्शित झाला तर त्यामुळे आचारसंहितेचा भंग होईल का, याचा निर्णय निवडणूक आयोगाने घ्यावा, असं सर्वोच्च न्यायालयाने म्हटलं होते त्यामुळे विवेक ओबेरॉय अभिनित हा चित्रपट आता लांबणीवर पडला आहे. त्यामुळे आता त्यांना निवडणूक पूर्ण होण्याची वाट पहावी लागणार आहे.