बुधवार, 25 डिसेंबर 2024
  1. मनोरंजन
  2. मराठी सिनेमा
  3. नाट्य-चित्र गप्पा
Written By

सुबोध भावे यांच्या तुला पाहते रे मालिकेला निवडणूक आयोगाची नोटीस

मनोरंजन आणि कला या सदरात मोडणाऱ्या टीव्ही मालिकांमध्ये राजकारण देखील घुसले असून त्यामुळे अनेक मालिका अडचणीत सापडल्या आहेत. या मालिकांनी छुप्या पद्धतीने सत्ताधारी भाजपाचा प्रचार सुरु केला अशी ओरड आता सुरु झाली आहे, हिंदी नंतर आता मराठी मालिकेवर सुद्धा आरोप होत आहेत. 
 
निवडणूक आयोगाने प्रसिद्ध अभिनेता सुभोध भावे यांची अभिनित मालिका 'तुला पाहते रे' निवडणुकीचा प्रचार केल्‍याने निर्मात्‍यांना कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. या गाजलेल्या मालिकेविरोधात काँग्रेसने निवडणूक आयोगाडे तक्रार केली आहे. या कारणामुळे मालिकेच्या निर्मात्यांना २४ तासांत सर्व स्पष्टीकरण देण्याचे आदेश आगोगाने दिले आहेत. 
 
‘तुला पाहते रे’ आणि इतर काही मालिकांनाही नोटीस बजावण्‍यात आली आहे. यामध्‍ये हिंदी मधील सुपरहिट मालिका ‘भाभीजी घर पर है’, ‘तुझसे है राबता’ आणि ‘कुंडली भाग्य’ या मालिकांमधून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विविध योजनांचे प्रचार केला जात असल्याचा आरोप काँग्रेसने केला आहे. तर ‘तुला पाहते रे’मध्ये ‘मेक इन इंडिया’चा प्रचार केला जात आहे. याबाबत काँग्रेस नेते सचिन सावंत यांनी ट्‍विट केले होते. त्‍यांनी ट्‍विटमध्‍ये म्‍हटले होते. त्यामुळे आता मालिका करमणूक करणार की राजकीय प्रचार अशी चर्चा सोशल मिडीयावर सुरु झाली आहे.