बुधवार, 24 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. लोकसभा निवडणूक 2019
  3. लोकसभा निवडणूक 2019 बातम्या
Written By
Last Modified: सोमवार, 8 एप्रिल 2019 (18:06 IST)

राधाकृष्ण विखे पाटील सोडणार कॉंग्रेस भाजपात करणार प्रवेश

लोकसभा निवडणुकीत काँग्रेसला सर्वात मोठा फटका बसणार आहे. काँग्रेसचे जेष्ठ आणि मोठे नेते आणि राज्याचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील हे स्वत: भाजपमध्ये प्रवेश करण्याची जोरदार शक्यता असून, अहमदनगर प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या सभेत, राधाकृष्ण विखे पाटील हे भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली आहे. येत्या 12 एप्रिलला पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या उपस्थितीत भाजपची जाहीर सभा होनर असून, याच सभेत राधाकृष्ण विखे पाटील हे भाजपमध्ये प्रवेश करण्याची शक्यता आहे.
 
राधाकृष्ण विखे पाटील यांचे सुपुत्र सुजय विखे पाटील यांनी काँग्रेसकडून तिकीट न मिळाल्याने, भाजपमध्ये प्रवेश केला असून, भाजपने सुजय विखे पाटील यांना नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी दिली आहे. मुलाला काँग्रेसने तिकीट दिले नाही म्हणून राधाकृष्ण विखे पाटील हे नाराज होते. मुलाचा प्रचार करण्यासाठी पक्षविरोधी भूमिका घ्यावी लागत असल्याने ते कात्रीत सापडले आहेत. अशा परिस्थितीत राधाकृष्ण विखे पाटील हे थेट काँग्रेसचा हात सोडून भाजपचं कमळ हाती घेण्याची चिन्हं आहेत. त्यामुळे काँग्रेसला फटका बसणार आहे. मात्र सुजय विखे यांना जगताप यांनी जोरदार आवाहन दिले असून शरद पवार यांनी सुद्धा विखे विरोधान भूमिका घेतली आहे. त्यामुळे विखे भाजपात गेल्याने काही फायदा होणार की नाही हे वेळच ठरवेल.