सोमवार, 23 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. लोकसभा निवडणूक 2019
  3. लोकसभा निवडणूक 2019 बातम्या
Written By
Last Modified: सोमवार, 8 एप्रिल 2019 (08:30 IST)

शिर्डीच्या कॉंग्रेस उमेदवाराची कोट्यावधीची संपत्ती, शिक्षण फक्त दुसरी पास

लोकसभा मतदारसंघातून शिर्डी येथील  कॉंग्रेसचे उमेदवार भाऊसाहेब मल्हारी कांबळे यांनी लोकसभा उमेदवार शपथपत्रात दिल्यानुसार 2017-18 ची मिळकत 25 लाख 75 हजार 533 रुपये एवढी असून 2013-14 ला ती 14 लाख 92 हजार 973 रुपये इतकी होती. यामध्ये पाहिले ते  त्यांचे शिक्षण फक्त इयत्ता दुसरी पर्यंत झालेले आहे. त्याच्या पत्नी मंदा भाऊसाहेब कांबळे यांची 2017-18 ची मिळकत 3 लाख 62 हजार 607 रुपये इतकी आहे.तरत्यांची स्थावर व जंगम मालमत्ता दोन कोटी 31 लाख रुपये इतकी आहे.नगर अर्बन बॅंक श्रीरामपूर बचत खात्यात दोन हजार 777 रुपये तर पत्नीच्या नावे दोन 401 रुपये, महाराष्ट्र बॅंकेतील संयुक्‍त खात्यात 18 हजार 589 रुपये,महाराष्ट्र बॅंक बचत खाते चार हजार 448 तर पत्नीच्या नावे चार हजार 398 रुपये स्टेट बॅंक श्रीरामपूर बचत खाते 14 हजार 309 रुपये,स्टेट बॅंक शाखा मुंबई मध्ये 86 हजार 294 रुपये, महाराष्ट्र बॅंक श्रीरामपूर खात्यात सहा हजार 685 रुपये रुपये, युनियन बॅंक ऑफ इंडिया एक लाख रुपये,मैत्रेय फ्लॉटर्स्‌ ऍण्ड ट्रर्क्‍चर प्रा.लि. या खात्यावर पत्नीच्या नावे 58 हजार 800 रुपये,एलआयसीत स्वतःच्या नावे 82 हजार 484 रुपये तर पत्नीच्या नावे 82 हजार 484 रुपये एलआयसी लाईफ इन्शुरन्स पत्नीचा विमा, पाच लाख 43 हजार 728 रुपये,महिंद्रा जीप गाडी 30 हजार रुपये, टोयटा इटीऑस 7 लाख रुपये आणि होंडा ऍक्‍टीव्हा (पत्नीच्या नावे) 40 हजार रुपये, सोने-चांदी जडजवाहीर भाऊसाहेब कांबळे यांच्या नावे 50 हजार रुपये,भाऊसाहेब कांबळे यांच्या नावे 1) दिघी येथील गट नं. 85, 2) मौजे भैरवनाथनगर गट नं.38/2 (संयुक्‍त) अदमासे चालू बाजार मुल्य पाच लाख 67 हजार रुपये आणि 95 हजार रुपये,दिघी येथील बिगरशेती जमीन गट नं. 85 वरील विकास बांधकाम इत्यादी मार्गाने केलेली गुंतवणूक अदमासे चालू बाजार मुल्य 31 लाख रुपये,श्रीरामपूर येथील वाणिज्य कार्यालय अदमासे चालू बाजार मुल्य 4 लाख रुपये, गुरूकृपा वॉर्ड नं.1 सर्व्हे नं.2325 पैकी.3) फ्लॅट नं. 1302 वर्सोवा मुंबई, अदमासे चालू बाजार मुल्य 1) 11 लाख 49 हजार 400, 2) 19 लाख 5 हजार 600 आणि 3) एक कोटी 60 लाख वरील 1 ते 5 चे चालू बाजार मुल्य दोन कोटी 32 लाख 17 हजार इतकी आहे.गृहकर्ज 13 लाख 72 हजार 780 रुपये, त्याच बॅंकेचे सीसी खाते 92 हजार 47, बॅंक ऑफ महाराष्ट्रा 2 लाख 24 हजार 608 रुपये आणि वाहनकर्ज 2 लाख 46 हजार 69 रुपये दायित्वाची एकूण बेरीज 19 लाख 35 हजार 704 अशी एकूण स्थावर जंगम मालमत्तेची रक्कम दोन कोटी 31 लाख 22 हजार अशी दाखविली आहे.