अरे बापरे हे सहाशे सेलेब्रिटी कलाकार म्हणतात भाजपाला मतदान करू नका
सध्या देशात लोकसभेचे जोरदार वारे वाहत आहेत. सत्तधारी आणि विरोधक एकमेकांवर टीका करत आहेत. तर नरेंद्र मोदी विरुद्ध राहुल गांधी असा सामना रंगला आहे. आता यामध्ये सिनेकलावंत आणि इतर सेलिब्रिटीनी देखील उडी घेतली असून जवळपास सहाशे कलाकार म्हणतात की भाजपा आणि मित्र पक्षाला मतदान करू नका. यामध्ये अभिनेते नसीरुद्दीन शाह यांच्यासह विविध 600 पेक्षा जास्त कलाकारांनी भाजपला मत न देण्याचं आवाहन केलंय. या सर्व कलाकारांनी एक पत्र लिहून जनतेला आवाहन केलंय, आवाहन करणाऱ्या अभिनेत्यांमध्य अमोल पालेकर, नसीरुद्दीन शाह, गिरीश कर्नाड, एमके रैना आणि उषा गांगुली यांच्यासह अनेकांचा समावेश आहे. वृत्तसंस्था पीटीआयच्या वृत्तानुसार, भारत, संविधान धोक्यात असल्याचं या कलाकार म्हणत आहेत. पत्र 12 भाषांमध्ये तयार करुन आर्टिस्ट युनायटेड इंडिया वेबसाईटवर टाकण्यात आलंय. या पत्रानुसार ही होऊ घातलेली लोकसभा निवडणूक देशातील सर्वात गंभीर निवडणूक असून, गीत, नृत्य, हास्य धोक्यात आले आहे. सोबतच आपले संविधान देखील धोक्यात आले आहे. यामध्ये जिथे तर्क, वितर्क, चर्चा होतात अशा सर्व संस्थांचा सरकारने गळा दाबला असून. एखाद्या लोकशाहीला सर्वात कमकुवत आणि सर्वात वंचित लोकच बळकट बनवू शकतात. कोणतीच लोकशाही प्रश्नाविना, चर्चेविना आणि मजबूत विरोधकांशिवाय चालू शकत नाही. या सर्वच गोष्टी सध्याच्या सरकारने पायदळी तुडवल्या आहेत. सर्व जण भाजपला सत्तेतून बाहेर करण्यासाठी मतदान करा. संविधानाचं संरक्षण करा यांना सत्तेतून बाहेर करा असा मजकूर या पत्रात आह
या पत्रावर शांता गोखले, महेश एलकुंचेवार, महेश दत्तानी, अरुंधती नाग, कीर्ती जैन, अभिषेक मुजूमदार, कोंकणा सेन शर्मा, रत्ना पाठक शाह, ललित दुबे, मीता वशिष्ठ, मकरंद देशपांडे आणि अनुराग कश्यप आदी दिग्गज कलाकारांनी स्वाक्षरी केली आहे. आता या पत्राचा मतदानावर किती फरक पडतो हे येणारा काळ ठरवले मात्र या पत्राची आणि सर्व कलाकारांची जोरदार चर्चा सुरु झाली आहे.