मंगळवार, 14 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. लोकसभा निवडणूक 2019
  3. लोकसभा निवडणूक 2019 बातम्या
Written By
Last Modified: शनिवार, 6 एप्रिल 2019 (08:45 IST)

मोदी बिथरलेत म्हणून राष्ट्रवादीवर टीका जयंत पाटील यांचा टोला

समोर पराभव दिसू लागलाय. त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी बिथरले आहेत. म्हणूनच ते राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीवर टीका करत आहेत. आ. जयंत पाटील यांनी मोदींना असा टोला लगावला. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेशाध्यक्ष नागपूरमध्ये पत्रकार परिषदेत बोलत होते. भंडारा-गोंदिया लोकसभा मतदारसंघाचे राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस व मित्रपक्षांच्या संयुक्त महाआघाडी उमेदवार नाना पंचबुद्धे यांच्या प्रचारासाठी पुढे रवाना होण्याआधी ते नागपूरमध्ये पत्रकारांशी बोलत होते.ते पुढे म्हणाले... सैनिकांनी, अधिकाऱ्यांनी, वैज्ञानिकांनी केलेली कामगिरी मोदी स्वतःच्या नावावर थोपवून घेतायत. मोदींकडे भाषणासाठी मुद्दे नाहीत. त्यामुळे ते विरोधकांवर टीका करत आहेत.शिवसेनेने साडे चार वर्षे शिवसेनेने भाजपवर जोरदार टीका केली आणि शेवटी मांडीला मांडी लावून बसले. अशी कोणती नामुष्की आली की शिवसेना भाजप सोबत गेली?असा सवालही त्यांनी उपस्थित केला.