मनसे प्रमुख राज ठाकरे घेणार या पक्षातील उमेदवारांसाठी राज्यात ९ सभा
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे आगामी लोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीच्या प्रचारासाठी 9 सभा घेणार आहेत. या सभांमध्ये ते उत्तर मुंबईतील काँग्रेसच्या उमेदवार उर्मिला मातोंडकर, साताऱ्याचे खासदार उदयनराजे भोसले, बारामतीच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्यासह 9 उमेदवारांसाठी सभा घेणार असल्याचे वृत्त आहे. मात्र या सभा ते स्वतः स्वतंत्र घेणार आहेत अशी चर्चा आहे.
याज ठाकरे हे
सोलापूर – सुशील कुमार शिंदे (काँग्रेस),
नांदेड – अशोक चव्हाण (काँग्रेस),
सातारा – उदयनराजे भोसले (राष्ट्रवादी),
बारामती – सुप्रिया सुळे (राष्ट्रवादी),
मावळ – पार्थ पवार (राष्ट्रवादी),
उत्तर मुंबई – उर्मिला मातोंडकर (काँग्रेस),
ईशान्य मुंबई – संजय दीना पाटील (राष्ट्रवादी),
नाशिक – समीर भुजबळ (राष्ट्रवादी),
रायगड – सुनील तटकरे (राष्ट्रवादी),
यांच्यासाठी सभा घेण्याची दाट शक्यता आहे.
राज हे 12 एप्रिलपासून प्रचार सभा घेणार आहेत. आघाडीच्या उमेदवारांसाठी जरी राज ठाकरे सभा घेणार असून मात्र ते त्यांच्या व्यासपीठांवर जाणार नसून ते स्वतंत्र सभा घेणार आहेत.