बुधवार, 25 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. लोकसभा निवडणूक 2019
  3. लोकसभा निवडणूक 2019 बातम्या
Written By
Last Modified: सोमवार, 25 मार्च 2019 (17:20 IST)

मनसेचा निर्णय योग्य, सोशल मीडियावर व्हिडिओ क्लिप व्हायरल

लोकसभा निवडणूक न लढवण्याचा मनसेचा निर्णय योग्य आहे हे पटवून देण्यासाठी बाळासाहेब ठाकरे यांनी भूतकाळात घेतलेल्या अशा निर्णयांचा आधार घेतला आहे. तसेच बाळासाहेब ठाकरे आणि राज ठाकरे यांच्या निर्णयामधील साम्य शोधणारी व्हिडिओ क्लिप सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.
 
निवडणूक लढवली नाही याचा अर्थ तलवार म्यान केली, असा होत नाही तर भविष्यातील मोठ्या लढाईसाठी तलवार परजली जात आहे. असा दावा  या व्हिडिओ क्लिपमधून मनसेकडून केला जात आहे. सुरुवातीच्या काळात कट्टर विरोधकांना पराभूत करण्यासाठी बाळासाहेबांनी त्यांच्या विरोधात प्रचार केला होता. त्याचा फायदा काँग्रेसच्या एका गटाला झाला होता. मात्र बाळासाहेबांनी हा धोरणात्मक निर्णय घेतला होता.