मंगळवार, 24 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. लोकसभा निवडणूक 2019
  3. लोकसभा निवडणूक 2019 बातम्या
Written By
Last Modified: बुधवार, 27 मार्च 2019 (17:46 IST)

उद्धव ठाकरे, आदित्य आणि हे २० आहेत शिवसेना स्टार प्रचारक

लोकसभा निवडणुका २०१९ काही दिवसांवर आल्या आहेत. प्रथम दोन भागासाठी उमेदवारी अर्ज भरण्याची मुदतही संपली असून, आता राजकीय पक्षांनी प्रचारसभांचा जोरदार सुरु केल्या आहेत. यामध्ये सत्तधारी भाजप, काँग्रेस, राष्ट्रवादीनंतर आता शिवसेनेही स्टार प्रचारकांची यादी प्रसिद्ध केली आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे, यासोबत 20 जणांचा स्टार प्रचारकांच्या यादीत समावेश आहे.
 
शिवसेनेचे स्टार प्रचारक यादी पुढील प्रमाणे  :
 
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे
युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे
सुभाष देसाई
दिवाकर रावते
रामदास कदम
संजय राऊत
अनंत गीते
आनंदराव अडसूळ
एकनाथ शिंदे
चंद्रकांत खैरे
आदेश बांदेकर
गुलाबराव पाटील
विजय शिवतारे
सूर्यकांत महाडिक
विनोद घोसाळकर
नीलम गोऱ्हे
लक्ष्मण वडले
नितीन बानगुडे पाटील
वरुण सरदेसाई
राहुल लोंढे