शुक्रवार, 26 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. लोकसभा निवडणूक 2019
  3. लोकसभा निवडणूक 2019 बातम्या
Written By
Last Modified: शनिवार, 16 मार्च 2019 (17:36 IST)

सामनातून नाही तर स्वतः उद्धव ठाकरे जाहीर करतील लोकसभा उमेदवार

शिवसेनेच्या लोकसभा उमेदवारांची यादी आज जाहीर होण्याची शक्यता आहे. शिवसेना एरव्ही लोकसभेच्या उमेदवारांची यादी ‘सामाना’ या मुखपत्रातून प्रसिद्ध करत असते, यावेळी मात्र असे झाले नाही त्यामुळे आता शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे स्वत: ही उमेदवार यादी जाहीर करतील असे समोर येते आहे. राज्यातील युतीत शिवसेना 48 पैकी 23 लोकसभा मतदारसंघात उमेदवार निवडणूक लढवणार आहे. त्यात 25 उरलेल्या जागांवर भाजपचे उमेदवार उभे राहणार आहेत.  
 
पहिल्या शिवसेना यादीत कुणाला उमेदवारी मिळणार आणि कुणाचा पत्ता कट होणार याबाबतीत तर्कवितर्क लढवले जात आहेत. शिवसेनेची राज्यात भूमिका महत्वाची ठरणार असून, शिवसेना मुख्यमंत्री बसवणार असे बोलत आहे. त्यामुळे उमेदवार हे फार तपासून आणि निवडणून येणारे असे ठरवावे लागणार आहे. नरेद्र मोदी यांची अजूनही देशात लोकप्रियता आहे मात्र २१०४ सारखी स्थिती आज नाही तर राहुल गांधी देखील मोठा प्रभाव पाडत असून राज्यात आघाडी आणि वंचित बहुजन आघाडीचे मोठे आवाहन शिवसेनेसमोर असणार आहे.