शनिवार, 25 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. लोकसभा निवडणूक 2019
  3. लोकसभा निवडणूक 2019 बातम्या
Written By
Last Modified: गुरूवार, 14 मार्च 2019 (17:22 IST)

पुत्र प्रेम, राधाकृष्ण विखे पाटील सुजय विरोधात प्रचार करणार नाही

काँग्रेसचे वरिष्ठ नेते विधानसभेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी सुपुत्र सुजय विखे पाटील यांनी भाजप प्रवेशानंतर पहिल्यांदाच माध्यमांसमोर आपले मौन सोडले आहे. राधाकृष्ण विखे पाटील यांनी राष्ट्रवादीचे  राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार, काँग्रेसचे वरिष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांच्यावरही जोरदार टीका केली आहे. अहमदनगरमध्ये लोकसभा निवडणूक प्रचारवेळी भाजपात गेलेले सुजयविरोधात प्रचार करणार नाही, असेही राधाकृष्ण  विखे पाटील यांनी सांगितले आहे.
 
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांनी निवडणुकीपूर्वीच माझ्या हयात नसलेल्या वडिलांबाबत (दिवंगत बाळासाहेब विखे पाटील) भाष्य केले आहे. पवारांच्या  वक्तव्याने माला फार दु:ख झालं आहे. त्यांनी ते वक्तव्य करायला नको  होतं”, असं काँग्रेसचे नेते आणि राज्याचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी सांगितलं. मुंबईत घेतलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. सुजयच्या विरोधात प्रचार करणार नाही, मी नगरला प्रचाराला जाणार नाही,  माझ्याबद्दल जर राष्ट्रवादीला संशय असेल तर मी प्रचार कसा करु? असा प्रश्न राधाकृष्ण विखे पाटील यांनी उपस्थित केला ते पुढे म्हणाले की काँग्रेसशी माझी बांधिलकी आहे, पक्ष सांगेल ती जबादारी आणि  ते सांगतील ते मी  करेन, तोच निर्णय मान्य मला असणार आहे. शरद पवारांच्या मनात विखेंबद्दल अजूनही द्वेष आहे, प्रचाराला जाऊन संशय नको, त्यामुळे नगरमध्ये मी प्रचार करणार नाही असे राधाकृष्ण विखे पाटील यावेळी सांगितले आहे. 
 
तर अहमदनगरमध्ये शरद पवारांनी आधीच शंका उपस्थित केली, त्यामुळे मी प्रचाराला जाणार नाही, नगरमध्ये मी प्रचार करणार नाही असे त्यांनी संगितले. तर त्यांच्या पक्षातील नेते बाळासाहेब थोरांताना स्पष्टीकरण द्यायला मी  बांधिल नाही, ते काही हायकमांड नाहीत, त्यावर नंतर बोलेन असे  राधाकृष्ण विखे पाटील यावेळी पत्रकारांना सांगितले आहे. राधाकृष्ण विखे पाटील यांचे पुत्र भाजपात गेल्याने राज्यात मोठे राजकीय बदल झाले आहेत. तर  राष्ट्रवादीने देखील सुजय विरोधात लढणे ठाम ठेवले आहे. त्यामुळे आघाडीत आता जोरदार अंतर्गत वाद दिसून योतो आहे.