1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. लोकप्रिय
Written By
Last Modified: शुक्रवार, 15 मार्च 2019 (10:17 IST)

सोशल मीडियावर हे 'मिम' होतय व्हायरल

This 'Mim' viral on social media
सोशल मीडियावर सध्या एक मिम व्हायरल होत आहे. काँग्रेसच्या सोशल मीडिया आणि जनसंपर्क विभागाच्या प्रमुख दिव्या स्पंदना यांनी हे मिम ट्विट केले असून त्यावरुन भाजप-काँग्रेसमध्ये चांगलीच जुंपण्याची शक्यता आहे. या मिमच्या माध्यमातून त्यांनी मोदीभक्तांना लक्ष्य केलेय. मोदींच्या तीन भक्तांपैकी एकजण इतर दोघांइतकाच मूर्ख असतो, असा उपरोधिक संदेश मोदींच्या छायाचित्राखाली लिहण्यात आला आहे. 
 
काँग्रेसच्या या ट्विटला भाजप समर्थकांनी प्रत्युतर द्यायलाही सुरुवात केली आहे. एका भाजप समर्थकाने म्हटले आहे की, तुम्हाला माहिती आहे का, राहुल गांधींच्या तीन समर्थकांपैकी तिघेही राहुल गांधींइतकेच मूर्ख आहेत.