सोमवार, 30 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शुक्रवार, 22 फेब्रुवारी 2019 (17:03 IST)

सुप्रिया सुळे यांचा नरेंद्र मोदींना टोला

सरकार दहशतवादाबद्दल गंभीर नाही ही गोष्ट दुर्दैवी आहे. केवळ भाषणापुरतंच ५६ इंच छाती आहे असा टोला खासदार सुप्रिया सुळे यांनी नरेंद्र मोदींना लगावला आहे. बारामती रेल्वे स्थानकात सुरु असलेल्या कामांची सुप्रिया सुळे यांनी पाहणी केली. यावेळी त्यांनी सरकारवर टीका केली आहे.
 
सातत्यानं सुरक्षितता आणि रोजगारीबद्दल बोललं जात होतं. पण सध्या दहशतवादाशिवाय दुसरं काहीही ऐकायला मिळत नाही असं सांगताना पुलवामाच्या घटनेवेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी फोटोसेशन करण्यात व्यस्त होते अशी टीका सुप्रिया सुळे यांनी केली. नोटाबंदीनंतर दहशतवाद कमी होईल असा दावा करण्यात आला होता. मात्र गेल्या दोन वर्षात कधी नव्हती इतकी अस्वस्थता संपूर्ण देशात पहायला मिळत आहे असं सुप्रिया सुळे यांनी सांगितलं.