1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: बुधवार, 20 फेब्रुवारी 2019 (09:21 IST)

मी आणि सुप्रिया सुळेच निवडणूक लढवणार

Supriya Sule

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष रद पवार यांनीच अजित, रोहित, पार्थ यापैकी कोणीही लोकसभा निवडणूक लढवणार नसून, फक्‍त मी आणि सुप्रिया सुळेच निवडणूक लढवणार असल्याचे मंगळवारी लोणी काळभोर येथे जाहीर केले. त्यामुळे त्यांचे तिकीट खुद्द शरद पवारांनीच कापले असल्याचे स्पष्ट झाले आहे.

एमआयटीच्या कार्यक्रमानंतर राजकारणातील घराणेशाहीबद्दल पत्रकांरानी विचारलेल्या प्रश्‍नाबाबत शरद पवार म्हणाले, येत्या लोकसभा निवडणुकीसाठी मी स्वत: उभा राहणार आहे. काँग्रेसचे माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे जर निवडणूक लढवू शकतात, तर मीदेखील निवडणूक लढवू शकतो, असेदेखील त्यांनी स्पष्ट केले.