बुधवार, 25 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By

युवा सेनेचे प्रताप जम्मू काश्मीर येथील विद्यार्थ्यांना जबर मारहाण

शिक्षणासाठी आलेल्या जम्मू काश्मीर येथील विद्यार्थ्यांना युवासेनेच्या 10 ते 12 कार्यकर्त्यांकडून मारहाण केली गेली आहे. यवतमाळ च्या वैभव नगर परिसरात केली मारहाण केली असून, 3 ते 4 विद्यार्थ्यांना केली मारहाण केली गेली आहे.मारहाणीचा हा  विडिओ सोशल मीडियावर  व्हायरल केला गेला आहे. 

मारहाण झालेल्या विद्यार्थी लोहारा पोलिसात तक्रार देण्यासाठी दाखल केली असून, युवा सेनेच्या कार्यकर्त्यांची धरपकड पोलिसांनी सुरु केली आहे. काश्मीर मध्ये परत जा म्हणून मारहाण करण्यात आली आहे. पुलवामा येथे गेल्या आठवड्यात केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या (सीआरपीएफ) ताफ्यावरील दहशतवादी हल्ल्यात 41 जवान शहीद झाले होते. या घटनेनंतर देशातील विविध भागांमध्ये काश्मिरी विद्यार्थ्यांना मारहाण केल्याची घटना समोर आली आहे.

याचे लोण आता यवतमाळमध्ये पोहोचले असे दिसून येते आहे.या व्हिडिओत युवा सेनेचे कार्यकर्ते त्या तरुणांना नाव आणि काश्मीरमधून कुठून आला आहात, असे विचारताना दिसतात. तुम्ही लोक इथे शिक्षणासाठी येतात आणि तिथे आमच्या जवानांना मारता, असे सांगत कार्यकर्ते त्या विद्यार्थ्यांना मारहाण करताना व्हिडिओत दिसते.