मंगळवार, 28 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By

काय ED च्या भीतीने शिवसेना तयार झाली युतीसाठी

महाराष्ट्रात लोकसभा निवडणुकांसाठी भाजप व शिवसेना यांच्यात सीट्सवर सहमती पटल्यानंतर काँग्रेसने टीका करत प्रश्न विचारला आहे की ही महाभेसळ आहे वा महाभय. काँग्रेसने आरोप केला आहे की भाजपने ED ची भीती दाखवून शिवसेनेला युतीसाठी राजी केले आहे.
 
पक्षाचे वरिष्ठ नेते अहमद पटेल यांनी ट्विट केले की 'आधी बिहार, मग महाराष्ट्र आणि आता तामिळनाडू, एकानंतर एक भाजप युती करत आहे. सर्वात मोठा प्रश्न आहे की हे महाभेसळ आहे की महाभीती ?' दोन्ही पक्षांमध्ये युतीसंबंधी घोषणा झाल्यानंतर पुण्यात राज्य विधानसभेत नेता विपक्ष विखे पाटिल, ‘शिवसेनेला ED ची भीती दाखवून युती करण्यासाठी भाग पाडले गेले आहे, अशी सूचना असल्याचे म्हटले.'
 
काँग्रेसचे वरिष्ठ नेते म्हणाले की सत्ताधारी पक्षाची पराभवाची भीती दिसून येत आहे. महाराष्ट्र काँग्रेस प्रमुख अशोक चव्हाण यांनी शिवसेनेवर टीका करत म्हटले की ‘टाइगर देखील असहाय्य आहे.' उल्लेखनीय आहे की महाराष्ट्राच्या 48 लोकसभा जागांमधून भाजप 25 तर शिवसेना 23 सीट्सवर लढणार. दोन्ही पक्ष युतीच्या इतर साथीदारांना त्यांच्या वाट्याच्या सीट्स दिल्यावर या वर्षी प्रस्तावित 288 सदस्यीय राज्य विधानसभेत बरोबरीने मैदान उतरतील.
 
महाराष्ट्र सीएम देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेना आणि भाजपमध्ये युती झाल्याची घोषणा करत म्हटले की युती आगामी लोकसभा और विधानसभा निवडणुकांसाठी राहील. फडणवीस यांनी म्हटले की आमच्यात कुठलाही गैरसमज नाही. सीएम देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्र विधानसभा निवडणुकांबद्दल युतीची स्थिती स्पष्ट केली. त्यांनी म्हटले की 'प्रदेशात आमच्या मित्रांची जागा राखून इतर जागांवरून भाजप आणि शिवसेना अर्ध्या- अर्ध्या सीटांवरुन निवडणुका लढतील.' भाजप अध्यक्ष अमित शाह, शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दोन्ही पक्षांमध्ये युती झाल्याचे सांगितले.