1. लाईफस्टाईल
  2. लव्ह स्टेशन
  3. लव्ह शायरी
Written By

'आउट डेटेड' मोबाइल

अलमारी आवरताना सापडली 
एक जुनी डायरी,
एक जुनी फाइल
शेजारीच ठेवला होता 
माझा जुना 'आउट डेटेड' मोबाइल
तो मोबाइल बघताच 
मला एवढा आनंद झाला 
जणू लहानपणचा जीवलग मित्र
भेटायला घरी आला
असेल तो 'आउट डेटेड'
पण मी जपून ठेवला आहे फार
कारण तोच मोबाइल आहे
माझ्या पहिल्या प्रेमाचा साक्षीदार
तोच घडवून द्यायचा
आमची तासनतास 'चॅटिंग'
रात्र होताच 'सायलेंट' व्हायचा
अशी होती आमची 'सॅटिंग' 
'इनबाक्स' मधले ते 'मैसेज'
मी अजून ठेवले आहेत जपून
त्याची खूप आठवण आली
की वाचते अधून- मधून
हल्ली 'स्मार्टफोन' वापरते
पण तरी जुना फोनच आवडतो
कारण आज ही त्याचा 'गॅलेरीतून'
मला 'तो' हसताना दिसतो
नंतर बरेच 'मोबाइल' बदलले
कधी महागडे तर कधी स्वस्त
पण त्याची सर कशातच नाही
शेवटी पहिलं प्रेम 'स्पेशलंच' असतं 
 
-ऋचा दीपक कर्पे