बुधवार, 24 डिसेंबर 2025
  1. मनोरंजन
  2. हास्यकट्टा
  3. व्हॉट्सअप मॅसेजेस
Written By
Last Modified: गुरूवार, 14 फेब्रुवारी 2019 (13:48 IST)

शाळेत असताना मीही एकदा पडलो होतो प्रेमात

love poem
शाळेत असताना मीही एकदा 
पडलो होतो प्रेमात,
कळलच नाही,'काय बघीतलं होतं 
कुलकर्ण्यांच्या हेमात?'
 
कुलकर्ण्यांची हेमा म्हणजे 
शंभर नंबरी सोनं,
नाकावरती सोडावॉटर आणि 
मागे दोन वेण्या .
 
वारं आलं तर ऊडून जाईल 
अशी तीची काया,
रुपं पक्क काकूबाई...
पण अभ्यासावर माया
 
गॅदरींगमध्ये एकदां तिने 
गायलं होतं गाणं,
तेव्हापासून तिच्या घरी 
वाढलं येणं जाणं.
 
नारळीपौर्णीमेला तिन मला 
नारळीभात वाढला,
हातात तिच्या राखी बघून 
मीच पळ काढला
 
नको त्या वयात प्रेम करायची 
माझी मस्ती जीरून गेली,
शाळेमधली प्रेम-कहाणी 
शाळेमध्येच विरुन गेली.
 
थोड्याच दिवसात वेगळं व्हायची 
वेळ आमच्यावर आली होती,
मित्रांकडून कळलं, हेमाच्या 
वडीलांची बदली झाली होती
 
पुलाखालून दरम्यानच्या काळात 
बरचं पाणी वाहून गेलं
पुढ हेमाचं काय झालं ?
हे विचारायचच राहून गेलं
 
परवाच मला बाजारात 
अचानक हेमा दिसली
ओळखलचं नाही मी ....
म्हटल्यावर खुदकन गालात हसली.
 
आईशप्पथ सांगतो तुम्हाला तिच्यात 
काय सॉलीड बदल झाला होता,
चवळीच्या शेंगेला जणू 
आंब्याचा मोहोर आला होता
 
लग्नानंतर हेमा पाच वर्षात 
गरगरीत भरली होती
मागे उभ्या नवर्‍याने हातात 
भाजीची पिशवी धरली होती
 
सोडावॉटर जाऊन आता 
कॉन्टॅक्ट लेन्स आले होते,
कडेवर एक आणि हातामध्ये एक 
असे दोन प्रिन्स झाले होते.
 
मंगळसुत्र मिरवत म्हणाली, 
"हे आमचे हे"
बराच वेळ हात अवघडला 
जरा भाच्याला घे,
 
बरं झालं बरोबर मी माझ्या 
बायकोला नेलं होतं
माझ्या प्रेयसीनं नवर्‍यासमोर 
मलाच मामा केलं होतं
 
म्हणून आयुष्यात माणसाने कधी 
चुकू नये नेमात
शाळेत असताना मीही एकदा 
पडलो होतो प्रेमात