1. लाईफस्टाईल
  2. खाद्य संस्कृती
  3. उपवासाचे पदार्थ
Written By
Last Modified: गुरूवार, 10 जुलै 2025 (08:00 IST)

गुरुपौर्णिमेला नैवेद्यात बनवा Anjeer Kheer Recipe

Anjir kheer
साहित्य-
पाच-अंजीर
एक कप- मखाना
एक कप- राजगिरा
अर्धा कप- सुकामेवा
वेलची कुस्करलेली
अर्धा कप- साखर
चार कप- दूध
कृती-
सर्वात आधी अंजीर कोमट पाण्यात अर्धा तास भिजत ठेवा. भिजल्यानंतर ते मिक्सर जारमध्ये ठेवा आणि पेस्ट बनवा. आता एका पॅनमध्ये दूध गरम करा. नंतर त्यात मखाना आणि राजगिरा घाला, आता अंजीर कुस्करून मिक्स करा. त्यानंतर सुकामेवा आणि वेलची पावडर घाला. आता ते थोडे उकळू द्या आणि नंतर साखर किंवा गूळ घाला आणि गॅस बंद करा. आता तयार खीर एका बाऊलमध्ये काढा. तर चला तयार आहे नैवेद्याची अंजीर खीर रेसिपी. 
अस्वीकरण (Disclaimer) : या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे.या माहितीची पूर्णता, विश्वासार्हता आणि अचूकता याबाबत वेबदुनिया कोणतीही हमी देत ​​नाही. अधिक माहितीसाठी संबंधित तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.
Edited By- Dhanashri Naik