1. धर्म
  2. हिंदू
  3. हिंदू धर्माविषयी
Written By
Last Modified: सोमवार, 7 जुलै 2025 (19:56 IST)

गुरु पौर्णिमेला साईबाबांची पूजा करण्याची संपूर्ण पूजा विधी, लागणारे साहित्य जाणून घ्या

shirdi
गुरु पौर्णिमा हा दिवस वेद व्यास यांच्या जन्मदिनी साजरा केला जातो, ज्यांनी वेदांचे संकलन केले आणि महाभारत लिहिले. गुरु पौर्णिमा हा हिंदू धर्मात गुरुंप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा आणि त्यांची पूजा करण्याचा महत्त्वाचा दिवस आहे. साईबाबा हे अनेकांचे आध्यात्मिक गुरु मानले जातात, आणि या दिवशी त्यांची पूजा मनोभावे केल्याने आध्यात्मिक प्रगती, शांती आणि समृद्धी प्राप्त होते अशी श्रद्धा आहे.
 
गुरु पौर्णिमेला साईबाबांची पूजा करण्याची पद्धत जाणून घ्या 
सर्वप्रथम सकाळी लवकर उठून स्नान करा आणि स्वच्छ वस्त्र परिधान करा.
पूजेची जागा स्वच्छ करा. साईबाबांचा फोटो किंवा मूर्ती स्वच्छ कपड्याने पुसून ठेवा.
पूजेच्या ठिकाणी स्वच्छ कपडा पसरवा आणि त्यावर साईबाबांचा फोटो किंवा मूर्ती ठेवा.
साईबाबांच्या फोटो/मूर्तीसमोर तांब्यामध्ये पाणी, ताम्हणात हळद-कुंकू, अक्षता, फुले इत्यादी ठेवा.
 
पूजेसाठी आवश्यक साहित्य: साईबाबांचा फोटो/मूर्ती, फुले, हळद-कुंकू, अक्षता, उदबत्ती, कापूर, दिवा, नैवेद्य (खीर, शिरा किंवा साईबाबांना प्रिय असलेले पदार्थ), तांब्या, ताम्हण, पंचामृत (दूध, दही, तूप, मध, साखर).
पूजा विधी:
सर्वप्रथम हातात पाणी, अक्षता, फुल घेऊन संकल्प करा.जवळ तेलाचा किंवा तुपाचा दिवा प्रज्वलित करा.
साईबाबांच्या फोटो किंवा मूर्तीवर पंचामृताने अभिषेक करा. नंतर स्वच्छ पाण्याने धुवून घ्या.
 बाबांच्या फोटो किंवा मूर्तीवर हळद-कुंकू, अक्षता, फुले,बेलाची पाने,तुळशीची पाने अर्पण करा हे साईबाबांना विशेष प्रिय आहे. 
 साईबाबांचे ॐ साईं नमो नमः” किंवा “श्री साईनाथाय नमः”किंवा साई गायत्री मंत्राचे जप करा.
साईबाबांना शिरा, फळ, खीर किंवा खडीसाखरेचा नैवेद्य दाखवा. 
 साईबाबाबांची आरती आरती साईबाबा सौख्य दातार जीवा म्हणा.
आरती झाल्यावर साईबाबांचे ध्यान करा. आणि मनोभावे प्रार्थना करा. पूजा संपूर्ण झाल्यावर साईबाबांना नमस्कार करा आणि प्रसादाचे वाटप करा. 
शक्य असल्यास या दिवशी उपास करा. या दिवशी दान आणि सेवा करा.
 साईबाबांचा आशीर्वाद तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबाला मिळो.हीच सदिच्छा!।। जय साईनाथ।। 
Edited By - Priya Dixit