शनिवार, 11 जानेवारी 2025
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By
Last Modified: मंगळवार, 19 फेब्रुवारी 2019 (15:55 IST)

सोनमनं सोशल मीडियावर बदललं आपलं नाव

बॉलिवूडची फॅशन आयकॉन सोनम कपूर नेहमीच आपल्या चाहत्यांना सरप्राईज देत असते. आतादेखील तिने आपल्या चाहत्यांना एक सरप्राईज दिले आहे. काय असेल हे सरप्राईज जाणून घेण्यासाठी तुम्ही उत्सुक असाल ना... तिने सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर आपले नाव बदलून 'झोया सिंह सोळंकी' असे ठेवले आहे. तिने स्वतःचे नाव बदलले त्याचे कारण काय असावे. असा प्रश्न आता सगळ्यांना पडला असेल. त्यासाठी सोनम कपूर आणि दलकर सलान यांच्या आगामी 'झोया फॅक्टर' चित्रपटाबाबत जाणून घ्यावे लागेल. या सिनेमाचा फर्स्ट लूक रिलीज झाला असून अनुजा चंद्राच्या 'झोया फॅक्टर' या कादंबरीवर हा सिनेमा बेतलेला आहे. 'झोया फॅक्टर' चित्रपटासाठीच सोनम कपूरने सोशल मीडियावरच्या आपल्या अकाउंटमध्ये बदल केला आहे. आता सगळ्या नेटवर्किंग साईटवर सोनमच्या प्रोफाईलचे नाव झोया सिंह सोळंकी असे दिसणार आहे. लग्न झाल्यावर काही महिन्यांपूर्वीच सोनमने ट्विटर हॅन्डलवरील नाव सोनम  कपूर बदलून सोनम आहुजा असे केले होते. आता त्यात पुन्हा बदल केला गेला आहे. हा बदल केवळ झोया फॅक्टरच्या प्रमोशनसाठी केला गेला आहे.