शनिवार, 11 जानेवारी 2025
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By
Last Modified: गुरूवार, 31 जानेवारी 2019 (19:52 IST)

यामी गौतमचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल

अभिनेत्री यामी गौतमचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतो आहे. एका फॅशन शोदरम्यान रॅम्प वॉक करत असताना अचानक यामीचा तोल गेल्याचं या व्हिडिओमध्ये स्पष्ट दिसत आहे. हा व्हिडिओ सोशल मीडियावर लिक करण्यात आला असून, इंटरनेटवर तो वाऱ्यासारखा पसरत आहे. मात्र, तोल जाऊनही न थांबता यामीने रॅम्पवॉक पूर्ण केल्याबद्दल जगभरातील लोक तिचं कौतुक करत आहेत. नुकत्याच पार पडलेल्या ‘लॅक्मे फॅशन वीक २०१९’ मध्ये यामीने सहभाग घेतला होता. यावेळी तिने सुंदर असा गुलाबी रंगाचा गाउन परिधान केला होता. या ड्रेसची सगळीकडे चर्चाही झाली. मात्र, चालता चालता हाच ड्रेस पायात आल्यामुळेच यामीचा तोल गेला आणि ती पडता पडता वाचली.