आलिया व रणबीरच्या नात्यात अंतर?
गेल्या अनेक दिवसांपासून रणबीर कपूर व आलिया भट्ट या दोघांच्या नात्याची चर्चा आहे. दोघांनाही एकेकांच्या घरचे पसंत करताना दिसत आहेत. फक्त आता आलिया वधू बनायचीच राहिली आहे असेही काही दिवसांपूर्वी म्हटले जात होते. इतकेच काय तर रणबीर कपूर व आलिया भट्ट या दोघांनी त्यांच्यातील अफेअरची कबुली मीडियासोर दिली होती. दीप-वीर, निक-यांका, विरुष्का या प्रसिद्ध जोड्यांच्या लग्नानंतर आता रणबीर आणि आलियाच्या लग्नाबाबत चाहत्यांमध्ये चर्चाही सुरू होती. परंतु त्यांच्या नात्यात सर्व काही ठीक नसल्याचं गेल्या अनेक दिवसांपासून दिसत आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, रणबीर कपूर स्वःतच आलियापासून दूर राहत आहे. याचे कारणही खुद्द आलियाच आहे. दोघांचं नात अजून घट्ट व्हावं, यासाठी आलिया प्रयत्न करत आहे. यासाठी ती सतत रणबीरला कॉल, मेसेजेस करत आहे. मात्र, तिचा हाच स्वभाव रणबीरला खटकत असल्यामुळे तो तिच्यापासून लांब राहतोय. रणबीरच्या अशा वागण्यावर आलिया देखील नाखूश असल्याचं समजतं. आलिया भट्ट व रणबीर कपूर यांच्या नात्याला कपूर परिवाराने देखील स्वीकारले आहे. या वर्षाच्या अखेरीस त्यांच्या या नात्याधील रुपांतर विवाह बंधनात व्हावे, अशी कपूर परिवाराची इच्छा आहे.