बुधवार, 25 डिसेंबर 2024
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By
Last Modified: बुधवार, 30 जानेवारी 2019 (17:58 IST)

अक्षयच्या गाण्यावर थिरकणार कार्तिक

आजकाल बॉलिवूडमध्ये 90च्या दशकातील गाण्यांचे रिमिक्स बनवण्याचा ट्रेंड सुरू आहे. आता आणखी एका चित्रपटात 90च्या दशकातील एका गाण्याचे रिमिक्स पाहायला ळिणार आहे. यावेळी रिमिक्समध्ये अक्षय कुमारच्या गाण्यावर कार्तिक आर्यन थिरकताना दिसून येणार आहे. अलीकडेच प्रेक्षकांनी सिंबामध्ये 90च्या दशकातील बॉलिवूड साँग आंख मारेचे रिमिक्स पाहिले होते. आता 90च्या दशकातील आणखी एका गाण्याचे रिमिक्स आपल्याला पाहायला मिळणार  आहे. कार्तिक आर्यनचा आगामी चित्रपट लुकाछुपीमध्ये हे सुपरहिट गाणे पाहायला ळिेल. 1997 मध्ये अक्षय कुमारचा अफलातून हा चित्रपट आला होता व याच चित्रपटातील गाणे ये खबर छपवा दो अखबार में रिक्रिएट करण्यात येणार आहे. मूळ गाणे अक्षय कुमार व ऊर्मिला मातोंडकर यांच्यावर चित्रित करण्यात आले होते, तर यावेळी हे गाणे कार्तिक आर्यन व कृती सेनन यांच्यावर चित्रित करण्यात येणार आहे.