बुधवार, 25 डिसेंबर 2024
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By
Last Modified: शुक्रवार, 25 जानेवारी 2019 (17:27 IST)

अशी घडली मणिकर्णिका!

अभिनेत्री कंगना राणावतने क्वीन, तनू वेडस्‌ मनूसारखे महिलाकेंद्रित चित्रपट केले. तिचा क्वीन चांगलाच गाजला. आता ती राणी लक्ष्मीबाईंची व्यक्तिरेखा साकारत आहे. मणिकर्णिकाः द क्वीन ऑफ झाशीमधून ती रुपेरी पडावर झळकणार आहे. कंगनाला दमदार हिटची गरज आहे. यातल्या व्यक्तिरेखेबद्दल ती व्यक्त होते. कंगना म्हणते, मणिकर्णिकाच्या माध्यमातून लोकांच्या हृदयात वसलेल्या झाशीच्या राणीसारख्या व्यक्तिमत्त्वाची भूमिका साकारायची संधी मिळणं ही माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे. यासाठी मी स्वतःला खूप नशीबवान समजते. ती सांगते, आजवर मी सर्वसामान्य मुलीच्या व्यक्तिरेखेत दिसले. पण झाशीची राणी सुपरहिरोच होती. हा अत्यंत वेगळ्या धाटणीचा असा चित्रपट आहे. ही व्यक्तिरेखा साकारल्यामुळे काही तरी वेगळं, हटके केल्याचं समाधान मला लाभलं आहे. झाशीच्या राणीने खूप मोठा पराक्रम गाजवला.

स्वातंत्र्यलढ्यातलं त्यांचं योगदान खूप मोठं होतं. 1953 मध्ये त्यांच्यावर एक चित्रपट आला होता. त्यानंतर हिंदी मालिकेतून त्यांच्या आयुष्यावर प्रकाश टाकण्यात आला. पण आजवर भव्य-दिव्य असं काहीच झालं नव्हतं. मी हा चित्रपट स्वीकारला तेव्हा खूप आश्चर्य वाटलं. झाशीच्या राणीवर अजून काहीच कसं झालं नाही हा प्रश्न मनात आला. पण त्यांच्यावर चित्रपट झाला नसल्याने मला तो करायची संधी मिळाली. याआधी एखादा चित्रपट आला असता तर पुन्हा तो कोणी केला नसता, असंवाटतं.