रविवार, 29 डिसेंबर 2024
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By
Last Modified: शनिवार, 19 जानेवारी 2019 (09:14 IST)

ठाकरे सिनेमातला आवाज बदला

शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या आयुष्यावर ठाकरे हा सिनेमा येतो आहे. यात बाळासाहेब ठाकरेंना देण्यात आलेला सचिन खेडकर याचा आवाज देण्यात आला. मात्र आता हा आवाज बदलण्यात आला आहे. आवाजीतल्या बदलासह ट्रेलर रिलिज करण्यात आला आहे. बदललेल्या ट्रेलरमधला आवाज कुणाचा आहे हे समजू शकलेले नाही. या बदलांसह आलेल्या ट्रेलरलाही युट्युबवर अनेक व्ह्यूज मिळाले आहेत. 
 
‘उठाओ लुंगी बजाओ पुंगी’ सारखा संवाद असेल किंवा ‘८० टक्के मराठी मुलांनाच काम मिळालं पाहिजे’ या आणि अशा सगळ्या संवादांना हा आवाज अत्यंत चपखल बसला आहे. ठाकरे हा सिनेमा २५ जानेवारीला प्रदर्शित होणार आहे.