शनिवार, 11 जानेवारी 2025
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By
Last Modified: मंगळवार, 15 जानेवारी 2019 (16:37 IST)

मणिरत्नमच्या आगामी चित्रपटाट अमिताभ ऐश्वर्या?

माजी विश्वसुंदरी व अभिनेत्री ऐश्वर्या राय-बच्चन हिने मणिरत्नम यांचा चित्रपट साईन केला आहे. हा चित्रपट कल्की कृष्णमूर्ती यांच्या 'द सन ऑफ पोन्नी' या उपन्यासावर आधारित आहे. हा बिग बजेट असलेला ऐतिहासिक ड्रामा आहे, ज्याची बाहुबली फ्रेंचाइजीप्रमाणे निर्मिती करण्यात येणार आहे. आता या चित्रपटात अमिताभ बच्चनही काम करणार असल्याचे समजते. अमिताभ यांना दिग्दर्शकांनी चित्रपटाचे कथानक ऐकविले असून त्यांना ते आवडलेही आहे. मात्र, या चित्रपटासाठी त्यांनी होकार दिला का नाही, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. जर अमिताभ यांनी होकार दर्शविल्यास प्रेक्षकांना पुन्हा एकदा अमिताभ-ऐश्वर्या या जोडीला पाहाण्याची संधी मिळणार आहे. यापूर्वी ही जोडी 2008 मध्ये  'सरकार राज'मध्ये झळकली होती. मणिरत्नम यांच्या बिग बजेट असलेल्या या चित्रपटात दक्षिण भारतीय चित्रपटसृष्टीतील अनेक दिग्गज कलाकारांची नावे सामील होण्याची शक्यता आहे. मणिरत्नम यांनी चित्रपटातील मुख्य नायिका म्हणून ऐश्वर्याला अप्रोच केले आहे. या चित्रपटाची घोषणा लवकरच होण्याची शक्यता आहे. दरम्यान, अमिताभ बच्चन यांचा नुकताच 'ठग्स ऑफ हिंदोस्तान' हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. तर ऐश्वर्या राय प्रदीर्घ काळानंतर अनुराग कश्यप यांच्या 'गुलाब जामून' चित्रपटात झळकणार आहे. यात अभिषेक बच्चनही मुख्य भूमिका साकारत आहे.