मंगळवार, 24 डिसेंबर 2024
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By

अमिताभ बच्चन 'आँखे २' भूमिका करणार

२००२ साली प्रदर्शित झालेला सुपरहिट चित्रपट 'आँखे'चा सीक्वल येणार असून या चित्रपटाच्या शूटिंगला २०१९च्या मध्यात सुरूवात होणार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन अनीस बझ्मी करणार आहेत. या चित्रपटाची कथा तीन अंध व्यक्तींभोवती फिरणार आहे.  या चित्रपटाच्या सीक्वलमध्ये अमिताभ बच्चन  देखील असणार आहेत.
 
तरूण अग्रवाल, सुनील लुल्लासोबत मिळून 'आँखे २' चित्रपटाची निर्मिती करणार आहेत. याबाबत तरूण अग्रवाल म्हणाले की, 'अमिताभ बच्चन या सीक्वलमध्ये आहेत. बाकी युवा कलाकार शोधत आहोत. 
 
 'आँखे २'च्या चित्रीकरणाबाबत सांगितले की,'मे-जुलै किंवा जून -ऑगस्टच्या दरम्यान या चित्रपटाच्या शुटिंगला सुरूवात करणार आहोत. लंडन व जॉर्जियामध्ये चित्रीकरण पार पडणार आहे. कथेत कॅसीनो असल्यामुळे ते जॉर्जियामध्ये आधीच बुक केले आहे. '