सोमवार, 23 डिसेंबर 2024
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By

दीपिका रणवीरच्या लग्नाच्या फोटोबद्दल स्मृती ईरानीची मजेदार पोस्ट

दीपिका पादुकोण आणि रणवीर सिंगच्या लग्नाचे फोटो बघण्यासाठी सगळे अत्यंत उत्सुक आहे. प्रत्येकाला वाटतंय की कधी फोटो बाहेर येतात. फॅन्स दीपिकाच्या टीमला फोटो शेअर करण्यासाठी निवेदन करत आहेत. परंतू केवळ फॅन्स नव्हे तर केंद्रीय मंत्री स्मृती ईरानी यासाठी उत्सुक आहे. त्यांनी स्वत: इंस्टाग्रामवर पोस्ट करून इच्छा जाहीर केली आहे.
 
स्मृती यांची पोस्ट बघून हसू येऊ शकतो कारण यात एक कंकाल बेंचवर बसलेला आहे आणि त्यांनी कॅप्शनमध्ये लिहिले आहे की ''जेव्हा आपण दीपिका आणि रणवीरच्या वॅडिंग फोटोची वाट खूप काळापासून बघत असाल...'' 
 
यानंतर अनेक फनी कमेंट ब‍घायला मिळाले. अनेक यूजर्स तर हे बघून खूश झाले की केवळ त्यांना नव्हे तर केंद्रीय मंत्र्यांना देखील फोटो बघण्याची घाई झाली आहे.
 
दीपिका पादुकोण आणि रणवीर सिंग आपल्या सहा वर्षाच्या नात्यानंतर विवाहच्या पवित्र बंधनात बांधले गेले आहे. दोघांचे इटली च्या सुंदर लेक कोमो येथील विला देल बलबियानेलो (Villa del balbianello) मध्ये विवाह संपन्न झाले.