शुक्रवार, 1 ऑगस्ट 2025
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By

अर्जुन कपूर - मलायका अरोरा यांचे गेट-मेट फिरत आहेत सोबत

bollywood news
अभिनेता, दिग्दर्शक अरबाज खान याच्यासोबतच्या फारकत घेतल्यावर  मॉडेल मलायका अरोरा खान हिचं नाव अभिनेता अर्जुन कपूर याच्यासोबत जोडलं गेलं आहे. मात्र आगोदर या अफवा वाटत होत्या, मात्र  काही दिवसांनी विविध कार्यक्रमांना या दोघांची एकत्र उपस्थिती दर्शवली त्यामुळे अनेक गोष्टी समोर येत आहेत. आता मात्र मलायका - अर्जुन यांचं नातं पाहता प्रेम करण्यासाठी वयाची किंवा इतर कशाचीच मर्यादा नसते हेच स्पष्ट केले. 

या सुरेख भावनेची  चाहूल मलायका आणि अर्जुनला लागली आहे. या नात्याविषयी कोणतीच प्रतिक्रिया दिलेली नाही.काही दिवसांपूर्वी मलायकाने आपण अरबाजसोबतच्या नात्यातून वेगळं झाल्यानंतर नेमकं कसं आयुष्य जगत आहोत असे जाहीर केले होते. अर्जुन आणि मलायकाची चर्चा होतेय ती म्हणजे सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या काही फोटोंमुळे.  एकाच कारमधून हे कपल फिरतांना दिसत आहे. त्यामुळे दोघांचे प्रकरण सुरु आहे अशी जोरदार चर्चा सुरु झाली आहे.