गुरूवार, 26 डिसेंबर 2024
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By
Last Modified: सोमवार, 10 सप्टेंबर 2018 (13:49 IST)

'नमस्ते इंग्लंड'चा ट्रेलर रिलीज

काही दिवसापूर्वीच अर्जुन कपूर आणि परिणिती चोप्रा यांच्या आगामी 'नमस्ते इंग्लंड'चा पोस्टर वादाच्या भोवर्‍यात सापडले होते. भारताचा चुकीचा नकाशा या पोस्टरमध्ये दाखवल्यामुळे हा वाद निर्माण झाला होता. त्यानंतर ही चूक सुधारून नवीन पोस्टर रिलीज करण्यात आले. आता या चित्रपटाचा ट्रेलर रिलीज करण्यात आला आहे. अर्जुन कपूर आणि परिणिती चोप्रा या चित्रपटाच्या माध्यमातून पुन्हा एकदा एकत्र स्क्रिन शेअर करणार आहेत. ही जोडी यापूर्वी 'इश्कजादे' या चित्रपटामध्ये एकत्र झळकली होती. 'नमस्ते इंग्लंड' या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाल्यानंतर चित्रपट व्यापार विश्र्लेषक तरण आदर्श यांनी ट्विटरच्या माध्यमातून ही माहिती दिली आहे. या चित्रपटासाठी परिणिती आणि अर्जुन या दोघांनीही प्रचंड मेहनत घेतली असून दोघांनीही चित्रपटाचे प्रमोशनही जोरदार पद्धतीने केल्याचे पाहायला मिळाले  आहे. येत्या 19 ऑक्टोबर रोजी हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.