रविवार, 12 जानेवारी 2025
  1. मनोरंजन
  2. मराठी सिनेमा
  3. आगामी नाट्य-चित्र
Written By

प्रेक्षकांना खेचत आहे चुंबक, योग्य मार्ग दाखवणारी हृदयस्पर्शी कहाणी

पहिल्यांदा लीड रोल करत असलेले स्वानंद किरकिरे यांनी चुंबक चित्रपटात प्राण फुंकल्यासारखे वाटत आहे. अलीकडेच चुंबक सिनेमाचं ट्रेलर रिलीज झाले आहे. 45 वर्षाचा मंदबुद्धी पुरुष ट्रेलरच्या पहिल्या शॉटपासूनच हृदय जिंकतोय. चुंबक ही कहाणी आहे नवीन युगाची. वेटर म्हणून काम करणारा एक 15 वर्षाचा मुलगा बाळू आपल्या भविष्यासाठी चांगली स्वप्न बघत असतो. रसवंती गृहाचा व्यवसाय बसवायचा म्हणून गोळा करत असलेले पैसे तो गमावून बसतो आणि पैसे मिळवण्यासाठी दुसर्‍यांना गुंडाळू पाहतो. आपल्या मित्रांसोबत फसव्या लॉटरी स्कीम काढून ज्याला ठगतो तो भोळबाबाला प्रसन्ना मंदबुद्धी असतो.
 
बाळू आणि त्यात वेगळंच नातं निर्माण होतं. मंदबुद्धी असला तरी बाळू त्याकडून खूप काही शिकतो. बाळूच्या भूमिकेत साहिल जाधव आणि त्याच्या मित्राच्या भूमिकेत संग्राम देसाई आहे. दिग्दर्शन संदीप मोदी यांचे असून हा त्यांचा पहिला चित्रपट आहे. यापूर्वी ते नीरजा, खेले हम जी जान से आणि दिल्ली-6 सारख्या चित्रपटांमध्ये सहायक दिग्दर्शक म्हणून काम करून चुकले आहेत.
 
विशेष म्हणजे ही प्रस्तुती अक्षय कुमारची असून त्याच्या मनात याचे असे ठसे उमटले आहे की त्याने सिनेमाला सर्पोट करण्याचा निर्णय घेतला असून ट्विटरवर मराठीत व्हिडिओ अपलोड करून हा चित्रपट बघण्याचा खास आग्रह केला आहे. अक्षयने म्हटले की पैसा कमावण्यासाठी मी अनेक चित्रपट करत असतो, पण यात काही शिकवणूक आहे म्हणून मुलांना हा सिनेमा दाखवणे योग्य ठरेल. चुंबक 27 जुलै रोजी प्रदर्शित होणार आहे.