शनिवार, 28 डिसेंबर 2024
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By
Last Modified: बुधवार, 27 जून 2018 (14:34 IST)

उत्सुकता वाढवणारा 'कारवां' चा ट्रेलर रिलीज

इरफान खानची मुख्य भूमिका असलेल्या 'कारवां' चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाला आहे. मृतदेहासोबत प्रवास करणाऱ्या तिघांची मनोरंजक कहाणी या सिनेमात पाहायला मिळणार आहे. इरफान खानसोबत नवोदित अभिनेता दलकीर सलमान आणि मराठमोळी 'कप साँग'गर्ल मिथिला पालकर या चित्रपटात झळकणार आहेत. कृती खरबंदा, सिद्धार्थ मेनन हे कलाकारही या चित्रपटात दिसतील. आकर्ष खुराणाचं दिग्दर्शन असलेला 'कारवां' हा चित्रपट 3 ऑगस्ट रोजी प्रदर्शित होणार आहे. '3 लॉस्ट सोल्स, 2 डेड बॉडीज अँड अ जर्नी ऑफ अ लाईफटाईम' अशी सिनेमाची टॅगलाईन आहे. सिनेमाचा ट्रेलर प्रेक्षकांची उत्सुकता वाढवणारा आहे.