बुधवार, 25 डिसेंबर 2024
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By
Last Modified: मंगळवार, 26 जून 2018 (11:10 IST)

नुसरतने नाकारली एक कोटीची ऑफर

काही दिवसांपूर्वी प्रदर्शित झालेल्या 'सोनू के टिट्टू की स्वीटी' चित्रपटानं तिला पुन्हा एकदा प्रसिद्धी मिळवून दिली. चित्रपटातून दमदार अभिनय करत घराघरांत पोहोचलेली नुसरत भरुचा हिला दाक्षिणात्य चित्रपटात काम करण्यासाठी एका दिग्दर्शकाने 1 कोटीची ऑफर दिली होती, मात्र तिनं ती नाकारली आहे. नुसरतच्या वाट्याला सध्या बॉलिवूडमध्ये एकही चित्रपट नाही. 'सोनू के टिट्टू की स्वीटी' या कमी बजेट असणार्‍या चित्रपटाने 100 कोटींचा गल्ला पार केला होता. यात नुसरतच्या कामाचे खूपच कौतुक झालं. तिचे काम  पाहून तिला एका दिग्दर्शकांनी दाक्षिणात्य चित्रपटात काम करण्यासाठी 1 कोटीची ऑफर देऊ केली होती. मात्र तिनं ही ऑफर नाकारली आहे. माझ्या मते पैसा महत्त्वाचा नसतो, तुम्ही नेहमी चांगल्या कामाच्या शोधात असलं पाहिजे. गुणवत्तेवर तुम्ही जास्त भर दिला पाहिजे असं नुसरतचं मत आहे म्हणूनच तिनं ही ऑफर नाकारली आहे. जर कथा चांगली असेल तर आपण नक्कीच प्रादेशिक चित्रपटात का करू, अभिनेत्री म्हणून एखादी भूमिका मला भावली पाहिजे ती भूमिका आव्हानात्क असली पाहिजे, माझ्यासाठी काम करताना पैशांपेक्षा या गोष्टी जास्त महत्त्वाच्या आहेत.'