सोमवार, 27 जानेवारी 2025
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By

नाना म्हणतात दहा वर्षांपूर्वी जे बोललो होतो, तेच सत्य

नाना पाटेकर यांच्यावर अभिनेत्री तनुश्री दत्ता हिने केलेल्या लैंगिक छळाच्या आरोप केले आहे. यावर अभिनेता नाना पाटेकर यांनी पत्रकार परिषद घेतली आहे. नाना म्हणाले  मी दहा वर्षांपूर्वी जे बोललो होतो, तेच सत्य आहे,  वकिलांनी सांगितल्यामुळे मी यावर अधिक बोलणार नाही, अशी भूमिका घेतली आहे.

पत्रकार परिषद अवघ्या अर्ध्या मिनिटात आटोपती घेतली आहे. नाना पुढे म्हणाला  की, मला प्रसारमाध्यमांशी बोलायला आवडते. मी नेहमीच तुमच्याशी संवाद साधत असतो,  सध्या माझ्या वकिलांनी मला प्रसारमाध्यमांशी अतिरिक्त  बोलायला मनाई केली असून, अन्यथा मी कधीच यावर प्रतिक्रिया दिली असती, असे स्पष्ट केले आहे. मी दहा वर्षांपूर्वी बोललो होतो तेच सत्य आहे, असे सांगत नाना पाटेकर यांनी पत्रकार परिषदेतून काढता पाय घेतला आहे. त्यामुळे तनुश्रीचे प्रकरण काय होते आणि कोर्टात काय निकाल लागतो याकडे सर्वांचे लक्ष आहे.