मंगळवार, 24 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. मराठा आरक्षण
Written By
Last Modified: बुधवार, 25 जुलै 2018 (15:40 IST)

सकल मराठा समाजाचा मुंबई - ठाण्यातील सुरु असलेला बंद मागे; पत्रकार परिषदेत घोषणा

मराठा समाजाचा मुंबई ठाणे सुरु असलेला बंद अखेर स्थगित केला आहे. ही घोषणा पत्रकार परिषदेत करण्यात आली आहे. पत्रकार परिषदेत सरकारवर जोरदार टीका केली असून सरकारने दोन वर्षापासून आमची फसवणूक केली. त्यामुळे मूक मोर्चाऐवजी ठोक मोर्चा केला असे परिषदेत स्पष्ट केले आहे. सकल मराठा क्रांती मोर्चाने मुंबई बंदचं आंदोलन मागे घेतलं आहे. मराठा मोर्चाकडून आंदोलन मागे घेत असल्याची घोषणा केली आहे. आंदोलकांना शांतता राखण्याचे आव्हान करण्यात आलं आहे. ठाणे, मुंबईतही आंदोलन स्थगित करत असल्याची घोषणा करण्यात आली आहे. काही ठिकाणी बंदला हिंसक वळण लागल्यानंतर आता बंद मागे घेतल्याची घोषणा करण्यात आली आहे. शांतता राखण्याच्या मराठा समन्वयकांकडून आवाहन करण्यात आलं आहे. 
सरकारने दोन वर्षापासून आमची फसवणूक केली. त्यामुळे मूक मोर्चाऐवजी ठोक मोर्चा केला. 
सरकारच्या निष्क्रियतेमुळे मराठा समाज रस्त्यावर उतरला 
मराठा समाजाचा मुंबई - ठाण्यातील बंद मागे; पत्रकार परिषदेत घोषणा 
मुबई : मराठा क्रांती मोर्चाकडून मुंबई बंद च्या आंदोलनाला स्थगिती. सकल मराठा मोर्चाचे मुंबई समन्वयक विरेंद्र पवार यांनी जाहीर केले.