1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By
Last Modified: मंगळवार, 11 सप्टेंबर 2018 (11:21 IST)

अचानक का सोडले बॉलिवूड? तनुश्रीचा खुलासा

tamisjree datta
'आशिक बनाया आपने' या चित्रपटातून चर्चेत आलेली अभिनेत्री तनुश्री दत्ता सध्या चर्चेत आहे. बॉलिवूडमधून गेली अनेक वर्षे गायब असलेली तनुश्री गत दोन महिन्यांपासून भारतात आहे. यादरम्यान मीडियाला दिलेल्या मुलाखतीत तनुश्रीने अनेक गोष्टींचा खुलासा केला आहे. यापैकी एक म्हणजे, तनुश्रीने अचानक बॉलिवूडका सोडले? एका मुलाखतीत तिला हा प्रश्र्न केला गेला. या प्रश्र्नावर तिने थेट नाना पाटेकरचे नाव घेतले. नाना पाटेकर मुळे मी बॉलिवूड सोडले, असे ती म्हणाली. 2008 मध्ये 'हॉर्न ओके प्लीज'च्या शूटिंगदरम्यान तनुश्रीने नाना पाटेकर यांच्यावर छेडखानी केल्याचा आरोप केला होता. तिच्या या आरोपानंतर मेकर्सनी तनुश्रीला या चित्रपटातून डच्चू देत, तिच्या जागी राखी सावंतला घेतले होते. 
 
'हॉर्न ओके प्लीज'च्या एका गाण्याचे शूट सुरू होते. या गाण्याला गणेश आचार्य कोरिओग्राफ करीत होता. यादरम्यान नानाने मला मिठी मारली आणि डान्स स्टेप्स शिकवायला सुरुवात केली, असा आरोप तनुश्रीने केला. कुणाला काही कळायच्या आत मी शूटिंग सोडून पळत वॅनिटी व्हॅनमध्ये गेली. ही गोष्ट सेटवर उपस्थित असलेल्या तनुच्या आईला समजली आणि तिने एकच गोंधळ घातला. घटनेची कुठलीही खातरजमा न करताच तनुश्रीच्या आईने काही पत्रकारांना बोलाविले. नानाने मात्र याकडे दुर्लक्ष करीत सेट सोडला. पत्रकारांनी तनुश्रीला या घटनेविषयी विचारले तेव्हा तिने काहीही न सांगता, थेट पोलीस ठाणे गाठत नानाच्या विरोधात एफआयआर नोंदविला. यानंतर काय घडले हे कोणालाही कळले नाही. मात्र यामुळे तनुश्रीला इंडस्ट्रीमधून कायमचे गायब व्हावे लागले या एपिसोडनंतर तनुश्रीला इंडस्ट्रीत काम मिळणे बंद झाले आणि यानंतर तनुश्रीने मुंबई सोडण्याचाच निर्णय घेतला.