बुधवार, 25 डिसेंबर 2024
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By

लूकमुळे असते नेहमी चर्चेत...

'बाहुबली'मध्ये कटप्पाची भूमिका निभावणार्‍या अभिनेते सत्यराज यांची तुम्हाला ओळख झालीच असेल.... परंतु, कटप्पा यांच्या मुलीबद्दल तुम्हाला माहीत आहे का? सत्यराज यांच्या सुंदर मुलीचं नाव आहे दिव्या... दिव्या फिल्मी दुनियेच्या झगगाटापासून दूर राहणंच पसंत करते... हॉट लूकुळे अनेकदा चर्चेत असते. दिव्या व्यवसायानं एक न्युट्रिअ‍ॅलिस्ट असून लोकांना खाण-पानासंबंधी सल्ला देत असते. गेल्या सात वर्षांपासून दिव्या न्युट्रिअ‍ॅलिस्ट म्हणून काम करतेय... चेन्नईतील दोन क्लिनिकमध्ये ती सध्या लोकांना सल्ला देण्याचं काम करते. सध्या ती 'न्यूट्रिशन'मध्ये पीएचडीही पूर्ण करतेय. उल्लेखनीय म्हणजे, दिव्याचा भाऊ आणि सत्यराज यांचा मुलगा सिबी हादेखील एक तमिळ अभिनेता आहे. सुंदर दिव्यानंही सिनेक्षेत्रात यावं, अशी तिच्या चाहत्यांची इच्छा आहे... सोशल मीडियावर अशा प्रतिक्रिया पाहिल्यानंतर आपला सिनेमात काम करण्याचा कोणताही मानस नसल्याचं दिव्यानं आधीच स्पष्ट केलंय. परंतु, आपल्याला सिनेमे पाहण्याची आवड आहे, असं सांगायला ती विसरत नाही.