शुक्रवार, 10 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By

बेकायदा पार्क गाड्यांचे फोटो द्या, बक्षिस मिळवा

रस्त्यावर बेकायदेशीरपणे पार्क करण्यात येणा-या कारचे फोटो तुमच्या मोबाइल फोनवर घ्या आणि संबंधित विभागाला किंवा पोलिसांना पाठवा असं आवाहन केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी केले आहे. बेकायदेशीर पार्किंगसाठी 500 रुपयांचा दंड असून, त्यातील 10 टक्के रक्कम गाडीची माहिती पाठवणा-याला देण्यात येईल', असंही त्यांनी स्पष्ट केलं आहे. 'पार्किंगला जागाच शिल्लक नसल्याने लोक त्यासाठी रस्त्यांचा वापर करत आहेत. किमान मोठ्या संस्थांमध्ये तरी पार्किंगची सुविधा असली पाहिजे', असं गडकरींनी सांगितलं.
 
'प्रत्येक दिवस माझ्यासाठी लाजिरवाणा असतो. अॅम्बेसिडर गाड्या येत असतात....मोठे लोक येत असतात. संसदेसमोर संपुर्ण रस्ता ब्लॉक होतो. आणि पार्किंगची जागा बांधण्यासाठी मला 13 परवानग्यांची गरज होती. फक्त सिंगल पार्किंग लॉट बांधण्याची परवानगी मिळण्यासाठी मला अनेक महिने लागले. मी हा मुद्दा शहरविकास मंत्री वैंकय्या नायडू यांच्याकडे उपस्थित केला आहे', अशी माहिती गडकरींनी दिली.