रविवार, 12 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. क्रिकेट मराठी
  3. क्रिकेट वृत्त
Written By

मिताली राजवर बॉलिवूडपट काढणार

भारतीय महिला क्रिकेट ब्रिगेडच्या शिलेदारा मिताली राजवर बॉलिवूडपट काढण्याची घोषणा व्हायाकॉम 18 मोशन पिक्चर्सने केली आहे. मितालीची भूमिका कोणती अभिनेत्री साकारणार, याची उत्सुकता शिगेला पोहचली आहे.त्यामुळे धोनी, कपिल देव यांच्या पंक्तीत बसण्याचा मान मिताली राजला मिळाला आहे.
 
‘माझ्या आयुष्यावर चित्रपट निघणार असल्याने मला अत्यंत आनंद होत आहे. या चित्रपटातून अनेक तरुणींना क्रीडा क्षेत्रात करिअर करण्याची प्रेरणा मिळेल’ अशी अपेक्षा मितालीने व्यक्त केली आहे.