शुक्रवार, 22 ऑगस्ट 2025
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By

शाहरुखला बॉलिवूडमध्ये 25 वर्षं पूर्ण

Shah Rukh Khan has completed 25 years in Bollywood
शाहरुख खान  चाहत्यांना शुभेच्छा दिल्या आहेत. दिवाळी किंवा ईद काहीही असलं तरी एकत्र येण्याचा आनंद वेगळाच असतो. मी खूप आनंदित आहे. मलाही परवाच समजलं की बॉलिवूडमध्ये मला 25 वर्षं झाली. मात्र मला वाटतं बॉलिवूडमध्ये 26 ते 27 वर्ष झाली असावीत. तरीही 25 वर्ष हा खूप मोठा काळ असतो. लोकांनी मला एवढे वर्षं प्रेम दिलं त्याबद्दल मी आभारी असल्याचे सांगितले. तो पत्रकार परिषदेत बोलत होता.  
 
ईदच्या दिवशी सर्वांना भेटून आनंद होतो. मला पाहण्यासाठी लोक वेगवेगळ्या शहरांतून येतात. बंगल्याबाहेर चाहत्यांची गर्दी होत असल्यानं ब-याचदा वाहतुकीची कोंडी होते. त्यामुळे वाहनचालकांसह आजूबाजूच्या लोकांना होणा-या त्रासाबाबत मी दिलगीर  व्यक्त केली. यावेळी  सलमान खानचा ट्युबलाइट सिनेमा मला खूप आवडला, असं म्हणत शाहरुखनं सलमानचीही स्तुती केली.