रविवार, 29 डिसेंबर 2024
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By
Last Updated :मुंबई , गुरूवार, 24 ऑगस्ट 2017 (11:13 IST)

बॉलिवूडचे तीन दिग्गज अभिनेते प्रभासच्या ‘साहो’त‘व्हिलन’

अभिनेता प्रभासच्या आगामी ‘साहो’ या सिनेमाची सध्या जोरदार चर्चा रंगली आहे. आधी या सिनेमातील हिरोईनची चर्चा रंगली होती. आता या सिनेमातील खलनायकाची चर्चा सुरू आहे. या सिनेमात बॉलिवूडचे तीन दिग्गज अभिनेते व्हिलन साकारणार आहेत.
 
प्रभास ‘साहो’ सिनेमाचे शूटिंग करत आहे. या सिनेमात त्याची हिरोईन म्हणून अभिनेत्री श्रद्धा कपूरची निवड करण्यात आली. हा सिनेमा एक अ‍ॅक्शन सिनेमा असून यात हिरो इतकंच व्हिलनलाही महत्व असणार आहे. त्यामुळे व्हिलन कोण असणार याकडेही अनेकांच्या नजरा लागल्या होत्या.  सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या सिनेमात अभिनेते जॅकी श्रॉफ, नील नितीन मुकेश आणि चंकी पांडे व्हिलनच्या भूमिकेत दिसणार आहे. आता हे बॉलिवूड सिनेमातील हिरो ‘साहो’मध्ये प्रभाससमोर व्हिलन म्हणून उभे राहणार असल्याने या सिनेमाची उत्सुकताही अधिक ताणली गेली आहे.