गुरूवार, 26 डिसेंबर 2024
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By

“जुडवा 1’च्या “जुडवा 2’ला शुभेच्छा

वरुण धवनच्या “जुडवा 2’ने बॉलिवूडमध्ये खूप चर्चा सुरु झाली आहे. वरुणचा “जुडवा 2′ हा सलमान खानच्या “जुडवा’चाच सिक्‍वेल आहे. करिष्मा कपूर आणि रंभा या त्यावेळी त्याच्या नायिका होत्या. आता “जुडवा 2′ मध्ये वरुण धवनच्या बरोबर तापसी पन्नू आणि जॅकलीन फर्नांडिस आहेत. कथानक आणि बाकीचे विनोदी कथानक सगळे सारखेच असणार आहे. त्यामुळे या सिनेमाशी सलमान खानही जोडलेला आहे.
 
आपल्या या दशकभरापूर्वीच्या सिनेमाची आठवण म्हणून सलमानने वरुणच्या “जुडवा 2’मध्ये एक छोटीशी भूमिका करायचे मान्य केले आहे. “जुडवा 2’च्या ट्रेलरमध्ये सलमान आपल्याला बघायला मिळणार आहे. अर्थात सलमानच्या नेहमीच्या स्टाईलप्रमाणे त्याच्या या छोट्याश्‍या भूमिकेबाबतही गुप्तता ठेवली गेली आहे. सलमानने “जुडवा 2′ करणाऱ्या वरुण धवनला मस्त शुभेच्छा दिल्या आहेत.
 
आता सलमान आणि आमीर खानचा “अंदाज अपना अपना’चाही सिक्‍वेल येणार आहे. मात्र यामध्येही या दोघांच्याऐवजी नवीन हिरोंची जोडी असणार आहे. कदाचित त्याही सिक्‍वेलमध्ये सलमान आपल्या ईच्छेनुसार एखादा छोटा रोल करून आपल्या फॅन्सला आश्‍चर्याचा धक्का देऊ शकतो.