मंगळवार, 31 डिसेंबर 2024
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By
Last Updated : सोमवार, 21 ऑगस्ट 2017 (17:35 IST)

प्रियंका चोप्राची उडाली झोप

सध्या प्रियांका चोप्राचा एक पाय अमेरिकेत अन्‌ एक भारतात, असे होते आहे. साहजिक याचा परिणाम व्हायचा तो झाला आहे. प्रियांका चोप्रा सध्या जाम बिझी आहे. हॉलिवूडसोबत बॉलिवूड प्रोजेक्‍ट असा मोठ्ठा व्याप घेऊन सध्या ती जगते आहे. खरे तर सध्या प्रियांकाजवळ कुठलाही बॉलिवूड सिनेमा नाही. पण आपल्या प्रॉडक्‍शन हाऊसद्वारे बॉलिवूड आणि प्रादेशिक सिनेमांच्या निर्मितीचे तिचे काम जोरात सुरु आहे. याच कारणाने तूर्तास तिचा एक पाय अमेरिकेत अन्‌ एक भारतात, असे होते आहे. साहजिक याचा परिणाम व्हायचा तो झाला आहे. या प्रचंड बिझी शेड्यूलचा थेट परिणाम प्रियांकाच्या झोपेवर झाला आहे.
 
सध्या माझी झोप उडाली आहे, असे प्रियांकाने म्हटले आहे. विशेष म्हणजे, असे का होते आहे, याचे कारण स्वत: प्रियांकालाही कळेनासे झाले आहे. “झोप येत नाही, तेव्हा माझ्या मेंदूत हजारो गोष्टींचे थैमान माजते. असे काय होते आहे, ठाऊक नाही. हा जेटलॅग(विमान प्रवासामुळे येणारा ताण)चा परिणाम आहे की, अत्याधिक थकव्याचा मला खरेच ठाऊक नाही.’ “ट्‌विटर’वर तिने लिहिले आहे.