शुक्रवार, 26 एप्रिल 2024
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. चित्रपट समीक्षा
Written By

चित्रपट समीक्षा: 'बरेली की बर्फी'ची चव विसरणार नाही तुम्ही

मुख्य कलाकार: कृती सनोन, आयुष्मान खुराना, राजकुमार राव, पंकज त्रिपाठी, सीमा भार्गव इत्यादी   
 
निर्देशक: अश्विनी अय्यर तिवारी
 
निर्माता: जंगली पिक्चर्स, बीआर स्टुडियोज
 
लव्ह स्टोरीज नेहमी महानतम नसते. मनुष्य नेहमी हीरो राहू शकत नाही कधी तो नायक तर कधी त्यात  नकारात्मक प्रवृती देखील असते आणि ज्याचा उद्देश्य फक्त आपल्या ध्येलाला गाठणे असते. डायरेक्टर अश्विनी अय्यर तिवारीचे चित्रपट 'बरेली की बर्फी'चा 'थॉट' देखील हाच आहे ज्याला फारच उत्तमरीत्या अश्विनीने चित्रपटात मांडले आहे.  
 
बरेलीत राहणारी बिट्टी मिश्रा आपल्यात मस्त राहणारी मुलगी आहे तिच्या आई वडिलांना तिच्या लग्नाची काळजी आहे. बिट्टी सिगारेट ओढते, रात्री उशीरा घरी येते, छतावर डांस करते. अर्थात तिच्यात ते सर्व दुर्गण आहे ज्याप्रमाणे ती आपल्या समाजात लग्नासाठी योग्य मुलगी नाही आहे. तुम्हाला माहीतच आहे की मुलगा आणि मुलींना समाजात बघण्याचा दृष्टिकोन अद्यापही वेगळा आहे.  
 
अशात बिट्टीच्या हातात एक पुस्तक लागते - 'बरेली की बर्फी', आणि बिट्टीला पूर्ण विश्वास होतो की हे पुस्तक तिचीत कथा आहे. ती लेखकाच्या प्रेमात पडते. दुसरीकडे प्रेमात धोका मिळालेला चिराग दुबे (आयुष्मान खुराना) आपल्या बबलीमुळे आपल्या प्रेम कथेवर 'बरेली की बर्फी' लिहून तर देतो पण आपले नाव न छापता तो आपला मित्र प्रीतम विद्रोही (राजकुमार राव)चे नाव जबरदस्ती छापवतो.  
 
बिट्टी प्रीतमच्या प्रेमात आणि आता चिराग बबलीला विसरून बिट्टीच्या प्रेमात पडलेला असतो. पुढे काय होत? काय चिराग बिट्टीला मिळवण्यात यशस्वी ठरतो की बिट्टी प्रीतमसोबत लग्न करेल याच सूत्रावर बनली आहे 'बरेली की बर्फी'.  
काय बघावे : एका लहान गावातील नायक नायिकेची प्रेम कथा ज्यात हीरो-हिरॉईनप्रमाणे काही महान विशेषता नाही आहे. फारच सामान्य गल्लीतील प्रेमकथा आहे पण हे ही डायरेक्टर अश्विनी अय्यर तिवारी ने फारच सुंदररीत्या चित्रांकन केले आहे. कृति सनोन, आयुष्मान खुराना आणि राजकुमार रावसोबत पंकज त्रिपाठी व सीमा भार्गव यांचा जोरदार अभिनय तुम्हाला बिट्टीच्या जगात नक्कीच घेऊन जाईल.  
 
का बघावी : 'बरेली की बर्फी' एकूण एक मनोरंजक चित्रपट आहे. या चित्रपटाचा आनंद तुम्ही घेऊ शकता.  
 
रेटिंग: 5/4 (चार) स्टार
 
अवधी : 2 तास 3 मिनिट