‘सुनिल ग्रोवर’ची कमाई एवढी आहे … बापरे!
सुनिल ग्रोवर हा द कपिल शर्मा शोमधून चांगला प्रसिद्धीस आला. मात्र काही वादामुळे तो त्या शो मधून बाहेर पडल्यानंतर सुनीलने त्याच्या मानधनात भरपूर वाढ केली आहे. काही दिवसांपूर्वीच सुनीलने दिलेल्या एका मुलाखतीत सांगितले की, कपिल शर्मा एका शोसाठी 7-8 लाख रुपये चार्ज करत असे, पण आता त्याने त्याच्या मानधनात वाढ केली आहे.
कपिल शर्मा शो सोडल्यानंतर सुनीलवर अनेक चांगल्या ऑफर्सचा भडीमार होत आहे. मात्र आता सध्या सुनील स्टेज शो आणि गेस्ट अपीअरंसवर लक्ष केंद्रीत करत आहे. आता सुनिल एका कार्यक्रमांसाठी 13-14 लाख रुपये घेत आहे.