शुक्रवार, 5 डिसेंबर 2025
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By
Last Modified: मंगळवार, 1 ऑगस्ट 2017 (11:23 IST)

अमृता खानविलकर दिसणार धर्मा प्रॉडक्शन्सच्या 'राझी'मध्ये

amruta khanvilkar
अभिनेत्री अमृता खानविलकर हे नाव मराठी सिनेरसिकाला नवे नाही. आपल्या नृत्याने व अभिनयाने निते आपले असे बळकट स्थान सिनेसृष्टीत निर्माण केले आहे. आता अमृताची वाटचाल हिंदीकडे येऊ लागली आहे. धर्मा प्रॉडक्शन्सच्या राझी या चित्रपटात ती काम करत आहे. ट्विटरवरून तिने ही माहिती चाहत्यांना दिली. काही महिन्यांपूर्वी आलेल्या रंगूनमध्येही तिची छोटी पण महत्तवाची भूमिके होती. आता धर्मासारख्या मोठ्या बॅनरमध्ये तिला प्रवेश मिळणे हे मराठी मनाला निश्चितच सुखावणारी बाब आहे.